छेड छाड क्यों ? ( मराठी / हिंदी )
लेखन आणि दिग्दर्शन : रंगचिंतक मंजुल भारद्वाज
नाटक "छेडछाड क्यों ?" शारीरिक ओळखीच्या पलीकडे.. व्यक्तित्व आणि अस्तित्वाची निर्मिती करते. पितृसत्ताक मानसिकतेचे खुले सत्य आहे आणि त्यावर कडा प्रहार करते. त्यांना ओळखण्याची, समजून घेण्याची, चिंतन करण्याची आणि बदलण्याची प्रक्रिया करते.
पितृसत्ताक समाजव्यवस्थेवर प्रहार करत , स्त्री कडे वस्तू म्हणून पाहण्याच्या मानसिकतेत परिवर्तन आणणारे हे नाटक आहे .मानसिक , लैंगिक ,शारीरिक अत्याचारा विरुद्ध तटस्थपणे लढा उभारणारे नाटक .
व्यक्तीच्या आत माणुसकी जागृत करण्याची सुरुवात. आपण मानवी दृष्टिकोनातून प्रत्येकाला पाहू आणि जगात मानवता टिकवूया या विचाराला जागवते.