A Play by Manjul Bhardwaj
Performed on 20 July 2025 at 6.00pm
Place:- Sundararao Solanke College, Majalgaon, Beed, Maharashtra.
अभिनयाच्या नऊ रसांनी कलाकारांनी "दर्दी" रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
- Prakash Solanke - प्रकाश सोळंके
"द... अदर वर्ल्ड" हा नाट्यप्रयोग यशस्वी संपन्न झाला. अभिनयाच्या नऊ रसांनी कलाकारांनी "दर्दी" रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
कलाकारांनी आत्मियतेने सादर केलेल्या अभिनयास दाद मिळाली तर तरच त्या कलाकृतीला "न्याय" मिळतो."द... अदर वर्ल्ड" हे नाटक प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडते ।
आपण खरंच कोण आहोत, आपण जगताना काय गमावतो, आणि आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ कधी समजतो? हे नाटक जसे जसे पुढे जात तेव्हा "वास्तव" डोळ्यासमोर आणायला लागत.
नाटक जगता आणि अनुभवता आले पाहिजे !
हा नाट्यप्रयोग केवळ पाहिला नाही तर तो अनुभवता आला.आणि माजलगावकरांना वेगळा प्रयोग दाखवू शकलो याचा आनंद आहे.
...
थियेटर ऑफ़ रेलेवंस
प्रस्तुत
नाटक : द...अदर वर्ल्ड ( मराठी )
लेखक - दिग्दर्शक : मंजुल भारद्वाज
कधी : 20 जुलै ,2025, रविवार, संध्याकाळी 6 वाजता
कुठे : सुंदरराव सोळंके महाविद्यालय,
माजलगांव,#बीड , महाराष्ट्र
कलाकार: अश्विनी नांदेड़कर, सायली पावसकर ,कोमल खामकर,तुषार म्हस्के, प्रियंका कांबले, नृपाली जोशी,तनिष्का लोंढे, प्रांजल गायकवाड़ आणि अन्य कलाकार !
रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "द...अदर वर्ल्ड" पृथ्वी, पर्यावरण आणि मानवतेला वाचवणारा कलात्मक संकल्प आहे