नाटक " लोक - शास्त्र सावित्री"
सावित्री सारखे जगण्याचे निर्णय घेताना आपल्या प्रत्येकाचे तळ्यात मळ्यात होते. माणूस म्हणून जगण्याची इच्छा असूनही आपण पुढाकार घेत नाही. त्या पुढाकारासाठी हे नाटक उत्प्रेरीत करते. हे नाटक माणुसकीची न्यायसंगत , विवेकसंमत आणि वैचारिक दृष्टी प्रदान करते , मानवीय अस्तित्वाचे जग प्रस्थापित करण्याची दृष्टी देते !
आतापर्यंत सावित्रीबाई फुलें विषयी आपण वाचले, ऐकले पण आता वेळ आहे त्यांच्या तत्वाला स्वतःत जागवण्याची. सावित्री स्वतःत निर्माण करण्याची !