नाटक: द... अदर वर्ल्ड (मराठी)
लेखक आणि दिग्दर्शक: मंजुल भारद्वाज
सहाय्यक दिग्दर्शक : अश्विनी नांदेडकर
निसर्गाची निर्मळता, पाण्याची शुद्धता, पृथ्वीची स्वच्छता आणि सृजनशक्ती वाचवूया !आज आपण प्रदूषणाच्या विळख्यात अडकलो आहोत आपली पंचतत्व आणि आपले विचारही प्रदूषित झाले आहेत ! आपली मनःशांती लोप पावत आहे. मनुष्य स्वतःच्याच मुळांना उध्वस्त करून आपल्या विध्वंसाचा काळ रचत आहे. निसर्गाचे संतुलन बिघडल्यावर आपण किती खुजे आहोत याची जाणीव आपल्याला होते.अश्मयुगीन कालखंडापासून आपण मानव उत्क्रांतीचा इतिहास रचला, पण ही उत्क्रांती एका विध्वंसाकडे वळली आणि पृथ्वीच्या विनाशाची सुरुवात झाली. नाटक "द... अदर वर्ल्ड" इकॉलॉजी, पर्यावरण, आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणाचा संकल्प घेत आहे.
नोट - राजा असो किंवा रंक, श्रीमंत असो वा गरीब पर्यावरण उध्वस्त झालं तर कोणीही वाचणार नाही !